+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustमहाविकास आघाडीचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार प्रारंभ adjustप्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी संपवले जीवन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह adjustनवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन adjustचंदगड तालुक्यात गोवा बनावटीची ७,४०,८८०/- रुपये किंमतीची दारु जप्त; एका आरोपीस अटक adjustभाजपला मोठा धक्का : आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही; तेलुगू देसम पार्टीची विरोधी भूमिका adjustबेकायदेशीर विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या एक जण ताब्यात 6,02,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त adjustशिरोली परिसरात चेन स्नॅचिंगः पाच लाखांचा ऐवज लुटला adjustकोल्हापूर शिरोली जकात नाक्यावरील स्थिर सर्वेक्षण पथकाला वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने आढळले; दागिने चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स लिमिटेडचे, कागदपत्रांची पडताळणी सुरू adjustमाध्यमांमधील आक्षेपार्ह बातम्यांवर लक्ष ठेवा : निवडणुक निरीक्षक (पोलीस) अर्णब घोष adjustपाडव्याची गोडी वाढविण्यास व्यापारी वर्ग सज्ज : आकर्षक सजावट, विविध सवलती, योजनाची ग्राहकांना भुरळ
1001217128
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule12 Oct 24 person by visibility 326 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा प्रकल्पांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस 100 ईलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांतर्गत BTM (Behind Power Meter) इन्फ्रास्ट्रक्चर एलटी लाईन - ट्रान्सपॉर्मर सबस्टेशन व डेपो डेव्हलपमेंट कामकाजाचा प्रारंभ कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते के.एम.टी. उपक्रमाच्या शास्त्रीनगर येथील यंत्रशाळेमध्ये करण्यात आला.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सहा.आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेस मंजूर झालेल्या पीएम ई-बस प्रकल्पाचा थोडक्यात माहिती सांगितली. यामध्ये एचटी व एलटी लाईनसाठी रु.17.95 कोटी व डेपो डेव्हलपमेंटचे सिव्हील कामकांजासाठी रु.17.18 कोटी मंजूर झाले असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाले असलेची माहिती यावेळी दिली.  

खा.धनंजय महाडीक यांनी के.एम.टी.ची सार्वजनिक प्रवासी वाहतुची सेवा ही कोल्हापूर जनतेसाठी अत्यावश्यक सेवा असलेने, ती पूर्ण क्षमतेने कार्यरत रहाणेसाठी इलेक्ट्रिक बसेसची मोठी मदत होणार असलेचे सांगून, या इलेक्ट्रिक बसेसमुळे कोल्हापूर शहरातील वायू प्रदुषण व ध्वनी प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असलेचे सांगितले. 100 बसेसच्या किंमतीसह सुमारे 250 कोटी रुपयांचा प्रकल्प कोल्हापूर शहरात होत आहे, तो लवकर कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणताही परिवहन उपक्रम हा फायद्यात चालत नसलेचे सांगून, कोल्हापूर महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसमुळे के.एम.टी.च्या डिझेलवरील खर्चात बचत होणार असलेने, के.एम.टी.चे व कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली. तसेच, यासाठी लागणारी वीज उपलब्ध होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबविलेस उर्जा निर्मिती होऊन वीजेवरील खर्चामध्ये बचत होऊ शकेल, अशी सूचना केली. 

यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (NCAP) प्राप्त निधीमधून सुमारे रु.2.37 कोटी खर्च करुन कचरा उठावासाठी खरेदी केलेल्या सीएनजी इंधनावरील 30 टिपर वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री महोदयांचे हस्ते करणेत आले.   

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक श्रीमती के. मंजूलक्ष्मी, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजीत उर्फ नाना कदम, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे मुख्य संघटक व माजी अति.परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते, आशिष ढवळे, सतिश लोळगे, आदिल फरास, रुपाराणी निकम, महेश वासुदेव, प्रकाश गवंडी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रकल्प विभाग प्रमुख पी.एन. गुरव, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, वर्क्स मॅनेजर दिपक पाटील, रणधीर मोरे, मनपा यंत्रशाळा प्रमुख विजयकुमार दाभाडे, अकौंटंट राजेंद्र सुर्यवंशी, कामगार अधिकारी व जनसंपर्क अधिकारी प्रदिप म्हेतर, खरेदी अधिकारी संजय जाधव, आस्थापना प्रमुख सौ.वानू साबळे, वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, इश्यु-कॅश अधिक्षक एन.बी. पोवार, सहा.वाहतूक निरिक्षक सुनिल पाटील, शिवाजी पाटील, विक्रम गवळी, अमेय जाधव, तौफिक भालदार, तसेच या प्रकल्पाचे सल्लागार प्रशांत हडकर, जोशी असोसिटस् चे जोशी, ठेकेदार किरण घुमे, निलेश पाटील तसेच यंत्रशाळा, वाहतूक व सामान्य प्रशासन विभागाकडील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.