... भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
schedule05 Oct 25 person by visibility 210 categoryराजकीय

▪️भाजप कोल्हापूर ग्रामीणच्या वतीने कुर तालुका भुदरगड येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय संकल्प मेळावा उत्साहात
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार असलो तरी या निवडणुकांमध्ये भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होऊ देणार नाही . अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली .कुर तालुका भुदरगड येथे भारतीय जनता पार्टी कोल्हापूरचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात ते बोलत होते .
यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक ही आपण महायुती म्हणून लढवलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाचा एकही आमदार नाही सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत ज्या कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांची निवडणूक आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने होऊ घातलेले आहे त्यांच्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काम करणे म्हणजे त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासारखेच आहे त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांच्या साठी काम करू .
आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा आमचा मानस असला तरी यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या वर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल .
यावेळी भाजपच्या कोल्हापूर जिल्हा पश्चिम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविकात विजय संकल्प मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला .आगामी 13 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे .याच तारखेला या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होणार आहेत .आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात त्या त्या लोकांना पक्षाचं आणि उमेदवाराचं काम करणं सोयीचं व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी तयारी करावी हा संदेश देण्यासाठीच हा विजय संकल्प मेळावा आयोजित केला असल्याचा पुनरुचार नाथाजी पाटील यांनी केला .
माजी आमदार संजय बाबा घाडगे के एस चौगुले महेश जाधव,अंबरीश सिंह घाटगे,अशोक अण्णा चराटीभगवानराव काटे हंबीरराव पाटील पी जी शिंदे ,शिवाजी बुवा अलकेश कांदळकर,संताजी घोरपडे ,वसंतराव प्रभावळे लहुजी जरग ,मेजर भिकाजी जाधव ,डॉक्टर आनंद गुरव सुशीला पाटील,महेश चौगुले हेमंत कोलेकर राजेंद्र तारळे,सुधीर कुंभार अरुण देसाई,संदीप नाथ बुवा ,संभाजी आरडे, तानाजी कुरणे,सचिन बल्लाळ ,व्ही टी जाधव ,विलास बेलेकर रवींद्र कामत राजेंद्र ठाकूर, भुदरगड तालुका अध्यक्ष संतोष पाटील ,रणजीत मुडूकशिवाले ,रवीश पाटील कौलवकर ,रेखा नांगरे पाटील , धीरज करलकर, मेघा राणी जाधव,नामदेव कांबळे,पांडुरंग वायदंडे ,भगवान शिंदे ,पंडित पाटील,मोहन सूर्यवंशी,सुनील तेली,रणजीत आडके, अमोल पाटील,अजित सिंह चव्हाण,डॉ .सुभाष जाधव, सूत्रसंचालन स्वप्निल सुपल यांनी केले .