रोटरी सेंट्रलतर्फे शिक्षकांचा सन्मान
schedule09 Oct 25 person by visibility 178 categoryसामाजिक

कोल्हापूर : रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल च्या वतीने टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते आणि क्लबचे अध्यक्ष अभिजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
एखाद्या राष्ट्राची प्रगती होण्यासाठी अनेक घटकांचा सहभाग असणे गरजेचे असते. त्यामध्ये भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरते , असे प्रतिपादन डॉ. शिंदे केले.
यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर सुनील रायकर, जिल्हा परिषद कावळटेक विद्यामंदिर शाळेचे शिक्षक जीवन मिठारी, सेवानिवृत्त शिक्षिका सुधाताई कुलकर्णी, कलाशिक्षक मिलिंद यादव, राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर कासारवाडा शाळेतील शिक्षक सुनिल कुदळे आणि प्रा. जयंती गायकवाड यांना गौरविण्यात आले
अध्यक्ष अभिजित भोसले यांनी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. प्रास्ताविक उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी केले. सूत्रसंचालन संदीप साळोखे यांनी केले. यावेळी सचिव निलेश पाटील, खजानिस संग्राम शेवरे, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्यासह रोटेरीयन उपस्थित होते.