SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथमकोल्हापूर महानगरपालिका : सेवानिवृत्त ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन प्रा.फंडाच्या रक्कमेचा धनादेश प्रदानकोल्हापुरात रस्त्यावर सोडलेल्या जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाईलग्नात आंदण म्हणून पुस्तकाच्या कपाटाची प्रथा सुरु होईल, त्याचवेळी समाज प्रगतीपथावर जाईल : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार सामाजिक कार्याबद्दल ममता मगदूम यांचा सत्कार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवानाडीकेटीई टेक्स्टाईलच्या २१ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडअसर्जन येथील स्मशानभूमीसाठी मूलभूत सुविधा देण्याची मागणी; प्रशासनाकडे निवेदनशक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन"सतेज मॅथ्स" मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल : देवश्री पाटील; डी. वाय. पी. साळोखेनगर येथे ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

जाहिरात

 

"सतेज मॅथ्स" मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल : देवश्री पाटील; डी. वाय. पी. साळोखेनगर येथे ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

schedule30 Jun 25 person by visibility 204 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अधिक आवड निर्माण होईल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होउन बौद्धिक क्षमताही विकसित होतील या माध्यमातून अभियांत्रिकीचा पायाही भक्कम होईल, असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. 

देवश्री पाटील म्हणाल्या, ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ ही परीक्षा विद्यार्थ्यांना गणितासारख्या तांत्रिक विषयात रुची निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल. त्यामुळे भविष्यातील स्पर्धा परीक्षा आणि अभियांत्रिकी शिक्षणातही याचा नक्कीच चांगला फायदा होईल. या परीक्षेला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 

या परीक्षेत सृष्टी किरापिले व  आकांक्षा तेजम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक वारके व अर्पिता पाटील यांनी द्वितीय  तर संजीवनी माने व शुभांगी कडोलकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २५ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गणिताचा वापर केवळ शालेय अभ्यासापुरता मर्यादित नाही. तो दैनंदिन जीवनात व व्यावसायिक क्षेत्रातही तितकाच उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी या विषयाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करावा.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सतेज मॅथ्स’ परीक्षा सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून जवळपास 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या समारंभास प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख,  प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सौ. वनश्री शिंदे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील,विश्वस्त ऋतुराज पाटील व विश्वस्त तेजस पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes