असर्जन येथील स्मशानभूमीसाठी मूलभूत सुविधा देण्याची मागणी; प्रशासनाकडे निवेदन
schedule30 Jun 25 person by visibility 211 categoryसामाजिक

नांदेड : असर्जन येथील स्मशानभूमीत आवश्यक त्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आज प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कीर्डीले आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सुरज खिराडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशिक ओढणे, चंद्रशेखर पाईकराव, जनता पँथरचे अध्यक्ष आकाश चव्हाण, जयदीप पैठणे, भीम प्रहारचे सम्यक खोसळे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जयकुमार कुंटे, अमोल पट्टेवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता, वीज, पाणीपुरवठा, टिनशेड व स्वच्छतागृह यांसारख्या अत्यावश्यक सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घ्यावा व स्मशानभूमीची सुविधा पूर्णत्वास न्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.