सामाजिक कार्याबद्दल ममता मगदूम यांचा सत्कार
schedule30 Jun 25 person by visibility 234 categoryसामाजिक

घुणकी : येथील श्री महादेव देवालय, घुणकी व्यवस्थापन कमिटी यांचेमार्फत ममता उमेश मगदूम यांना सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण ,अहिल्याबाई होळकर व राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती ग्रामपंचायत व महिला वर्गानी आयोजित केला होता.
यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता जाधव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी या मंगलप्रसंगी महिलांचा सन्मान म्हणून अहिल्याबाई होळकर सन्मान म्हणून गावातील भरारी महिला पतसंस्थेच्या संस्थापिका ममता उमेश मगदूम यांना लोकनियुक्त सरपंच सुजाता जाधव यांच्या हस्ते ''आदर्श महिला पुरस्कार' देण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील संदीप तेली, ग्राम सदस्य पंडित जाधव, नीलम शिंदे, संजय बुडे, तसेच महिला वर्ग प्रचंड प्रमाणात उपस्थित होते.