SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथमकोल्हापूर महानगरपालिका : सेवानिवृत्त ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन प्रा.फंडाच्या रक्कमेचा धनादेश प्रदानकोल्हापुरात रस्त्यावर सोडलेल्या जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाईलग्नात आंदण म्हणून पुस्तकाच्या कपाटाची प्रथा सुरु होईल, त्याचवेळी समाज प्रगतीपथावर जाईल : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार सामाजिक कार्याबद्दल ममता मगदूम यांचा सत्कार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवानाडीकेटीई टेक्स्टाईलच्या २१ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडअसर्जन येथील स्मशानभूमीसाठी मूलभूत सुविधा देण्याची मागणी; प्रशासनाकडे निवेदनशक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन"सतेज मॅथ्स" मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल : देवश्री पाटील; डी. वाय. पी. साळोखेनगर येथे ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

जाहिरात

 

कोल्हापुरात रस्त्यावर सोडलेल्या जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाई

schedule30 Jun 25 person by visibility 264 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : राजारामपूरी परिसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर काही मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडली होती. याबाबत महापालिकेकडे भटकी जनावरे व पाळीव जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असलेबाबतची तक्रार आली होती. 

त्याप्रमाणे महापालिकेने भटकी जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेतली. यावेळी खाजगी जनावरांच्या मालकांना त्यांची जनावरे रस्त्यावर न सोडणे बाबत सक्त सूचना दिल्या होत्या. परंतु वेळोवेळी सूचना देऊनही राजारामपूरी शाहू मिल परिसरातील हेमंत कवाळे व शुभम कवाळे यांनी त्यांची खाजगी जनावरे रस्त्यावर सोडलेने त्यांना प्रत्येकी रुपये 1000/- प्रमाणे रु.2000/- चा दंड करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, आरोग्य निरिक्षक स्वप्निल उलपे, महेश भोसले, शर्वरी कांबळे व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes