+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Sep 24 person by visibility 164 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २० सप्टेंबर) ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर एकदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. 

या समारंभास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख पाहुणे असतील, तर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. महेंद्र पंडित, कोल्हापूरचे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे प्रमुख उपस्थित असतील. दिवसभरातील विविध सत्रांत मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. जिल्हाधिकारी श्री. येडगे हे ‘महिला सुरक्षा धोरण’, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. पंडित हे ‘संकटसमयी कोठून मदत घ्यावी?’, अॅड. ठोंबरे हे ‘महिला सुरक्षाविषयक कायदे’ आणि डॉ. उबाळे हे ‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेस विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही संचालक डॉ. देवळाणकर यांनी केले आहे.