जळगावमध्ये रेल्वे अपघात 11 ठार , 40 जखमी
schedule22 Jan 25 person by visibility 255 categoryराज्य
मुंबई : जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी चेन ओढली. जीव वाचवण्यासाठी खाली उतरत असताना, अनेक प्रवासी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रेनखाली चिरडले गेले तर 40 प्रवासी जखमी आहेत.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, आतापर्यंत ८-१० मृतदेह पाचोरा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. इतर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत . रेल्वे आणि प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. असे सांगून आर्थिक मदत जाहीर केली आहे. मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले आहेत पूर्ण स्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. असे त्यांनी सांगितले आहे
जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये ११ मृतदेह रुग्णालयात आहेत तसेच ४० जखमींवर उपचार सुरू आहे.