बालकांच्या आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका : शिक्षण संचालक शरद गोसावी
schedule05 Feb 25 person by visibility 78 categoryराज्य
![](_smpnewsnetwork.com/u/pos/202502/smpPhoto_1703582685773~2tMI8Xg--800.jpg)
कोल्हापूर : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही.
पालकांना बालकांच्या प्रवेशा संदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिली जात असतील तर अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी महानगरपालिका, नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांच्याकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी. असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.