डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड
schedule19 Nov 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक
तळसंदे : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठच्या एमबीए व बीबीए विभागातील २४ विद्यार्थ्यांची निवड ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४ ते ५ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.
शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. शाळांना अकादमिक सपोर्ट, प्रशिक्षण, शिक्षणतंत्रज्ञान व शैक्षणिक सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीचे बंगळूर येथे मुख्यालय असून अनेक शहरामध्ये कार्यालये आहेत. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हद्वारे ही निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून २४ विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली.
यामध्ये एमबीए द्वितीय वर्षाच्या सिद्धी गोंडकर, नंदिनी जाधव, श्रद्धा कराडे, महेक सिरकाजी, शोएब पेंधारी, रविराज शिंदे, स्वलेहा पाटील, वरदराज गोऱपाडे, प्रतीक पाटील, सूरज बटगेरी, वैशान्वी मोरे, श्रुतिका हेबळे, तस्नीम देसाई, श्रुती सांकपाळ, यश कांबळे, निराज लाड, ओमकार गांचरी, रोहन पाटील, रोहित जवळदेकर, प्रथमेश जाधव, योगिता चव्हाण तर बीबीए तृतीय वर्षाच्या क्षितिजा पाटील व भक्ती खोत यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आमच्या विद्यापीठाच्या एमबीए, बीबीए विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर दिला जातो. विद्यापीठात विविध परीक्षांची तयारी, मुलाखत, विविध प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता प्रा.डॉ.मुरली भूपती, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. प्रदीप पाटील, प्रा स्वराज पाटील व विभाग समन्वयक शिवानी जंगम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.