कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई
schedule18 Nov 25 person by visibility 74 categoryमहानगरपालिका
▪️मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज वाय पी पोवार चौक, यादवनगर व गोखले कॉलेज या परिसरात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 2 हातगाड्या, 8 केबिन, 11 स्टॅण्ड बोर्ड, 7 लोखंडी पार्किंग जाळी, 6 लोखंडी टेबल, 2 लोखंडी खॉट जप्त करण्यात आले. तसेच सीपीआर चौक ते दसरा चौक, बिनखांबी मंदिर परिसर, जुना बुधवार तालीम मेनरोड या मुख्य रस्त्यावरील 18 डिजीटल बोर्ड व 163 लहान जाहिरात बोर्डवर कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, रविंद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे, प्रशांत आकुर्डेकर व अतिक्रमण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.