केआयटी ‘बेस्ट नॉलेज सेंटर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; आय.एस.टी.ई.च्या वतीने सन्मान
schedule18 Nov 25 person by visibility 120 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाला सन २०२४-२५ चा सर्वोत्कृष्ट ज्ञान केंद्र (पदवी) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र गोवा विभागाचा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. ९० हजार पुस्तके,३७ हजार ई-जर्नल्स वा रिसोर्सेस, प्लेग्यारिझम चेक करायचे सॉफ्टवेअर,अवांतर वाचनाची शेकडो पुस्तके अशा एक ना अनेक गोष्टींनी परिपूर्ण असणाऱ्या केआयटीच्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा आहे, सैन्य अधिकारी भरती संदर्भातील पुस्तके ही आहेत. अशा शैक्षणिक सुविधांची राष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल म्हणजे हा पुरस्कार आहे असे मत संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी या भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) या तंत्रशिक्षणातील शिक्षकांचे व्यावसायिक करिअर आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या या राष्ट्रीय संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. केआयटी चे ग्रंथालय हे केवळ पुस्तक ठेवण्याचे ठिकाण न राहता माहिती, संशोधन आणि आधुनिक शिक्षणाचे एक केंद्र म्हणून ते कार्यरत असल्याचे या पुरस्काराने सिद्ध झाले.
पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार,दि. १४ नोव्हेंबर २५ रोजी पुणे येथे मुख्य अतिथी डॉ.विलास सपकाळ,कुलगुरू एमजीएम युनिव्हर्सिटी, डॉ.राकेश जैन, कुलगुरू अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी पुणे यांच्या हस्ते व डॉ. प्रतापसिंह देसाई, अध्यक्ष आयएसटीई न्यू दिल्ली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व ग्रंथपाल डॉ.रोहन पोवार या दोघांनी हा पुरस्कार स्विकारला.संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांचे मोलाचे सहकार्य प्रोत्साहन या ज्ञान केंद्राच्या विकासासाठी मिळाले. भविष्यात ही वास्तु हे केंद्र अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे मत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी व्यक्त केले. ग्रंथालयाचे मध्यवर्ती समन्वयक डॉ. मंदार सोनटक्के, वरिष्ठ ग्रंथालय क्लार्क सौ.अनुपमा सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.