कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद
schedule23 Apr 26 person by visibility 136 category
कागल : येथील डी आर माने महाविद्यालय येथे अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ९ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील खुला गट अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यामध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या पार्थ सुतार याने ९ वर्षांखालील वयोगटात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत ४ पैकी ३.५ गुण मिळवले आणि प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद आपल्या नावावर केले.
पार्थच्या या यशाबद्दल शाळेत आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विलास सासमिले यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशासाठी पार्थला अनुज् चेस ॲकॅडमीचे प्रशिक्षक बाबूराव पाटील, शाळेचे प्राचार्य डॉ. विलास सासमिले आणि क्रीडा शिक्षिका अश्विनी गाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पार्थच्या या यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर शिल्पा पाटील यांनी त्याचे कौतुक केले असून शाळेतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.