SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथशिरोळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेशलोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा पाया: राष्ट्रीय पंचायत राज दिवसराज्यात ऊर्जा क्रांती: ५,२०० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात उभे राहणार तीन जलविद्युत प्रकल्पविधानसभा निवडणुकांचा धुरळा: पश्चिम बंगालमध्ये ९०%, तर तमिळनाडूमध्ये ८२% मतदान; बारामती-राहुरीचा कौलही मतपेटीत बंदगांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडएचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधीविद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभक्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेश

schedule24 Apr 26 person by visibility 132 categoryराज्य

शिरोळ : गुरुवारी रात्री गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरोळ तालुक्यात शेती, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे उभे पीकही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर  आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तहसीलदार यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

गुरुवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे स्थानिक  अडथळा निर्माण झाला. घरांवरील पत्र्यांच्या शेड उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

शेती क्षेत्रालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला, फळबागा व इतर पिके वाऱ्यामुळे आडवी झाली असून शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या सर्व नुकसानीची दखल घेत आमदार यड्रावकर यांनी तहसीलदारांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes