SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात ऊर्जा क्रांती: ५,२०० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात उभे राहणार तीन जलविद्युत प्रकल्पविधानसभा निवडणुकांचा धुरळा: पश्चिम बंगालमध्ये ९०%, तर तमिळनाडूमध्ये ८२% मतदान; बारामती-राहुरीचा कौलही मतपेटीत बंदगांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडएचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधीविद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभक्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपदमहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या विचारांत परिवर्तनाची सलग परंपरा: डॉ. राजन गवसकोल्हापुरात २७ एप्रिलला महागाईविरोधात रेशन बचाव समितीचा धडक मोर्चा; हजारो नागरिक रस्त्यावर उतरणारसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जाहिरात

 

गांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

schedule23 Apr 26 person by visibility 120 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधीनगरपर्यंतच्या हद्दीतील जागा महानगरपालिकेचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या जागेवरील सर्व बांधकामांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश दिले.

  याबाबत आज निवडणूक कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील तसेच अभियंता व सर्व्हेअर उपस्थित होते. 

बैठकीत शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 पासून गांधीनगर पर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील उचगांव महसूली गावांतील सर्व्हेनंबरातील सर्व बांधकामांची सखोल तपासणी करण्याचे निश्चित करण्यात आले. सदर तपासणी सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असून यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्र. 4, घरफाळा विभाग तसेच परवाना विभागातील कर्मचारी सहभागी राहणार आहेत. या मोहिमेत संबंधित जागेवरील सर्व इमारतींची मोजमापे करून बांधकामांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच घरफाळा व परवाना विभागामार्फत आवश्यक नोंदींची छाननीही करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes