SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हसूर येथील आरोग्य शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणीपुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास‘गोकुळ’मध्ये एकमुखी कारभारासाठीच दूध उत्पादकांचा कौल; विजयानंतर आमदार सतेज पाटील यांची पहिली प्रतिक्रियाजागतिक सांख्यिकी दिन: महत्त्व आणि गरजगोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिकगोकुळचा निकाल धक्कादायक, पण कौल मान्य; महायुतीकडून निकालाचे आत्मचिंतन करू : खा. धनंजय महाडिकआमदार सतेज पाटलांची गोकुळ निवडणुकीत कमाल; समविचारी आघाडीची बाजी! दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन चौगुले, ध्रुव गोयल, सिया परांजपे, शारंग भोईटे, जय पाटील, हर्ष कांबळे, विवान परांजपे, राजवर्धन मोरे विजेतेगोकुळ दूध संघ निवडणूक निकाल: महायुतीमधील भांडणे आणि बाद मते ठरली पराभवाचे कारण : नामदार हसन मुश्रीफतावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

जाहिरात

 

हसूर येथील आरोग्य शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणी

schedule20 Oct 26 person by visibility 123 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ९ हजार २१० वर

हसूर : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत हसूर येथे आयोजित शिबिरात ३८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २५१ नागरिकांची नेत्र तपासणी, तर १३२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरानंतर अभियानातील एकूण लाभार्थ्यांची संख्या ९ हजार २१० वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या या अभियानाला शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हसूर येथील शिबिरातही नागरिकांनी सहभाग नोंदवत मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होत असून, आजारांचे वेळीच निदान करण्यास मदत होत आहे.

यावेळी बाबासाहेब पाटील, नेमगोंडा पाटील, पायगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, आप्पासो चौगुले, रावसो मिनचे, रमेश चौगुले, तेजकुमार माणगांवे, बंडु माणगांवे, अभिजित पाटील, चेतन पाटील, देवराय कांबळे, अनीता पाटील, कुसुम पाटील, सुशिला माणगांवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes