+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule03 Sep 24 person by visibility 209 categoryशैक्षणिक
 कोल्हापूर : दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये यंदा चार अभ्यास केंद्राचा समावेश केला आहे. यात कोल्हापूर दोन,सांगली व सातारा प्रत्येकी एक अभ्यासकेंद्राचा समावेश आहे.

या अभ्यासकेंद्रांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने केंद्रांची संख्या ८६ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे हुपरी, सिंधु सिनिअर कॉलेज, गांधीनगर, सांगली जिल्ह्यातील ईश्वरराव मोरे-पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिघंची ता.आटपाडी, तसेच सातारा जिल्ह्यातील महिला महाविद्यालय,कराड यांचा समावेश आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापि प्रवेश घेतलेला नाही.तसेच ज्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून अपूर्ण शिक्षण पूर्ण करावयाचे आहे.अशांनी बी.ए.,बी.कॉम.,एम.ए.,एम.कॉम.,एम.एस्सी.गणित., एम.बी.ए.(डिस्टन्स आणि ऑनलाईन) या अभ्यासक्रमांना आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.