+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjust‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर विद्यापीठात शुक्रवारी विभागस्तरीय कार्यशाळा adjustश्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा खेळीमेळीत adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक शिक्षक समन्वयाला प्राधान्य : साजिद हुदली; केआयटीच्या प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात adjustऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन; योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा adjustडी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत; अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे adjustविद्यापीठात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन adjustशिवाजी विद्यापीठाचा पहिला सद्‍गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्रा. समीर चव्हाण यांना जाहीर adjustफिल्म-मेकिंग'च्या विद्यार्थ्यांची चित्रनगरीला भेट adjustकोल्हापुरात पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule16 Sep 24 person by visibility 262 categoryगुन्हे
कोल्हापूर : कसबा सांगाव, ता. कागल येथील परप्रांतीय अनोळखी युवकाचे डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी आदिनाथ मारुती लोखंडे (वय 22.रा. हळदी कांडगाव, सध्या क. सांगाव आणि सुहास बाळासो बिरांजे (वय 34रा. क. सांगाव जिरगे गल्ली) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांना पुढील तपासासाठी कागल पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.खुनाचा गुन्हा अवघ्या ३६ तासात उघड करण्यात आला.

दिनांक १४ जानेवारी रोजी कसबा सांगाव, ता कागल येथील मगदुम मळा शेजारी झाडीत एका पुरुष जातीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याची माहिती पोलीस ठाणेस मिळताच कागल पोलीस ठाणेचे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी रवाना झाले सदर इसमाचे डोक्यात दगड घातून चेहरा विदुप केलेला होता त्यामुळे मयताची ओळख पटत नव्हती. तसेच घटनास्थळावरील वस्तूस्थिती वरून सदर इसमाचा खून झालेचे निष्पन्न झाले.

 मयताची माहिती घेतली असता, खून झालेला व्यक्ती हा पंचतारांकीत एमआयडीसी मधील रेमन्ड चौक, कागल येथील सुर्दशन जिन्स लि कंपनीमध्ये बॉयलर डिपार्टमेंट मधील कामगार असलेचे समजले व कंपनीतील कामगार रुममध्ये राहणेस होता यावरुन मृत व्यक्तीची ओळख पटविणेत यश आले. व त्याचे नांव विकास सिंह सध्या रा. सुर्दशन जिन्स लि कंपनी रेमन्ड चौक, कागल मूळ गाव गोपी सिंह, ग्राम सिलवर पोस्ट गाँजावर लह, मझौली, गिजवारा, सौधी राज्य मध्यप्रदेश असे असलेचे समजले.

मयत व्यक्तीचे सोबतचा कामगार विरेंद्र कुमार कुशवाह यांनी दिले फिर्यादी वरून मयत यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी मोठ्या आकाराचा दगड डोक्यात घालून त्याचा खून करून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करणेचे उददेशाने मयताचे डावे पायाला नॉयलॉनची पटटी बांधून घटनास्थळावरून शेजारील असलेल्या झुडपामध्ये टाकलेला असलेबाबत फिर्याद दिली. त्या प्रमाणे कागल पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.

त्यानंतर पथकाने परिसरातील गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध सुरु केला, त्यावेळी सदर इसमांचा शोध सुरु असताना पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना सदरचे दोन इसम हे कसबा सांगाव, ता. कागल येथील असलेची माहिती प्राप्त झाली. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने १) आदिनाथ मारुती लोखंडे वय २२, मुळ रा. हळदी कांडगाव, बेघर गल्ली, ता. करवीर सध्या रा जिरगे गल्ली, कसबा सांगाव, कागल २) सुहास बाळासो बिरांजे वय ३४ रा जिरगे गल्ली, कसबा सांगाव, कागल यांना ताबेत घेतले त्यावेळी त्याचेकडे केले चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हयात वापरलेली एक मोटर सायकल इसम नामे सुहास बाळासो बिरांजे याच्याकडून मिळून आलेने अधिक तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे.