+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjust‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर विद्यापीठात शुक्रवारी विभागस्तरीय कार्यशाळा adjustश्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा खेळीमेळीत adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक शिक्षक समन्वयाला प्राधान्य : साजिद हुदली; केआयटीच्या प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात adjustऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन; योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा adjustडी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत; अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे adjustविद्यापीठात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन adjustशिवाजी विद्यापीठाचा पहिला सद्‍गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्रा. समीर चव्हाण यांना जाहीर adjustफिल्म-मेकिंग'च्या विद्यार्थ्यांची चित्रनगरीला भेट adjustकोल्हापुरात पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule16 Sep 24 person by visibility 288 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या वतीने स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते झाले.

संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले .सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यार्थी दशेत घ्यावयाची काळजी तसेच अभियांत्रिकीसाठी भविष्यात असणाऱ्या उज्वल संधी याबाबत मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी.जे. साठे यांनी इंडक्शन कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना सांगितला.शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.अक्षय थोरवत यांनी महाविद्यालयात लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, व्यासपीठांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.

संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले यांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निवास पाटील व प्रा.श्रुती काशीद यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले.