+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjust‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर विद्यापीठात शुक्रवारी विभागस्तरीय कार्यशाळा adjustश्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा खेळीमेळीत adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक शिक्षक समन्वयाला प्राधान्य : साजिद हुदली; केआयटीच्या प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात adjustऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन; योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा adjustडी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत; अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे adjustविद्यापीठात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन adjustशिवाजी विद्यापीठाचा पहिला सद्‍गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्रा. समीर चव्हाण यांना जाहीर adjustफिल्म-मेकिंग'च्या विद्यार्थ्यांची चित्रनगरीला भेट adjustकोल्हापुरात पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule15 Sep 24 person by visibility 249 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने नवीन मतदार नोंदणी करतेवेळी अल्पसंख्याक (मुस्लीम) यांची नोंदणी करू नये, असा ठराव केल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता; पण ही चूक लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने मुस्लीम नव्हे, तर बांगलादेश नागरिकांची नोंदणी करू नये, असे स्पष्टीकरण देण्यात आले. याप्रकरणी करवीरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागितला आहे.

 मे महिन्यात नागदेववाडी (ता. करवीर) येथील एका कॉलनीत बनावट आधारकार्ड बनवून राहत असलेल्या बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली होती. यावर, २८ ऑगस्टला झालेल्या शिंगणापूर गावसभेत चर्चा होऊन सतर्कता बाळगण्याची सूचना ग्रामस्थांनी दिली होती. हा ठराव करताना बांगलादेशी असे म्हणण्याऐवजी अल्पसंख्याक मुस्लीम असा शब्द वापरला होता. 

▪️सरपंचासह सदस्यांवर गुन्हा दाखल करा : मुस्लीम बोर्डिंग
कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने मुस्लीम मतदार नोंदणी न करण्याबाबत केलेला ठराव हा घटनाबाह्य असून धार्मिक तेढ निर्माण करणारा आहे. संबंधित सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांवर गुन्ह दाखल करा, अशी मागणी मुस्लीम बोर्डिंगच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे रविवारी करण्यात आली. 

हा ठराव म्हणजे मुस्लीम समाजावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार आहे. धर्माच्या आधारावर मतदानाचा अधिकार काढू घेणे योग्य नाही. याबद्दल सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

▪️ग्रामपंचायतीने मागितली माफी
 समाजात विषमता निर्माण करणारा किंवा तसा हेतू असणारा कोणत्याही प्रकारचा ठराव आम्ही करणार नाही. याबद्दल त्या पत्रात उल्लेख केलेल्या मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाची आम्ही माफी मागतो, असे पत्रक सरपंच रसिका पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.