+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjust‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर विद्यापीठात शुक्रवारी विभागस्तरीय कार्यशाळा adjustश्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा खेळीमेळीत adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक शिक्षक समन्वयाला प्राधान्य : साजिद हुदली; केआयटीच्या प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात adjustऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन; योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा adjustडी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत; अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे adjustविद्यापीठात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन adjustशिवाजी विद्यापीठाचा पहिला सद्‍गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्रा. समीर चव्हाण यांना जाहीर adjustफिल्म-मेकिंग'च्या विद्यार्थ्यांची चित्रनगरीला भेट adjustकोल्हापुरात पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule15 Sep 24 person by visibility 170 categoryगुन्हे
कोल्हापूर : विक्रमनगर परिसरात एका मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन सराईत गुंडाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला तात्काळ अटक केली. सचिन शिवाजी आगलावे (वय २६, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

विक्रमनगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ एका मंडळाने गणेशोत्सवासाठी स्टेज घातले होते. शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सराईत गुंड सचिन आगलावे हातात तळपती तलवार घेऊन तेथे आला. विशाल नावाच्या कार्यकर्त्याला मोठ्याने हाका मारून शिव्या देऊ लागला. अश्लील शिवीगाळ करत तलवार घेऊन तो स्टेजवर चढला. कार्यक्रम का बंद केला, मी तुम्हाला कधी त्रास दिला आहे का? असे मोठ्याने ओरडू लागला. या गुंडाची दहशत पाहून तेथील नागरिक भयभीत झाले. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी गेले.

 संशयित सचिन आगलावे याला अटक केली त्याच्याकडून २७ इंचाची तलवार जप्त केली आहे. विक्रमनगरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तो दहशत माजवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

संशयित सचिन आगलावे याच्यावर राजारामपुरी, शाहूपुरी, गांधीनगर अशा तीन पोलीस ठाण्यात मारहाण, दहशत माजवणे, शिवीगाळ यासह खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आहे.