SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहनजयसिंगपूर, हेरवाड व शिरदवाड या आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकननवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवारराजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान

जाहिरात

 

7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

schedule04 Feb 26 person by visibility 136 categoryराज्य

कोल्हापूर : 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत संबंधितांनी द्यावी.

मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी न दिल्यास 0231-2653714 या दूरध्वनीवर तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes