SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महावितरण पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी पुढे ढकला : सतेज पाटील यांची मागणी 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणारजिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागूमतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध6 व 7 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी7 फेब्रुवारी रोजी मतदानासाठी कामगारांना सुट्टी; सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहनजयसिंगपूर, हेरवाड व शिरदवाड या आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकननवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवारराजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

मतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध

schedule04 Feb 26 person by visibility 93 categoryराज्य

कोल्हापूर: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघासाठी नेमलेले मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06.00 वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवशी शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी काही कृतींवर मनाई करण्यात आली आहे.
  या आदेशानुसार मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बूथ स्थापित करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे तसेच सर्व प्रकारची वाहने वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
  तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणे किंवा वापरणे तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित अधिकारी/कर्मचारी वगळून मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधींनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे, फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे निषिद्ध करण्यात आले आहे.
  याशिवाय मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची शस्त्रे  बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
  या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 233 प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes