जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागू
schedule04 Feb 26 person by visibility 82 categoryराज्य
कोल्हापूर: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार सोमवार 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कारवीर, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, कागल, राधानगरी, आजरा, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद (गट) व पंचायत समिती (गण) यामधील मतदार संघासाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान होवून व सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी नमूद ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ निहाय मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
तालुक्याचे नाव व मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे-
करवीर- शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कसबा बावडा, गगनबावडा- तहसिलदार कार्यालय, शाहुवाडी- जुने शासकीय धान्य गोदाम, तहसिल कार्यालय, पन्हाळा- नगरपरिषद, मयूर बाग हॉल, कागल- जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरी- तालुका क्रिडा संकुल, राजर्षी शाहू विद्यामंदीर जवळ, आजरा- तहसिलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हॉल, भुदरगड- तालुका क्रिडा संकुल, मौनी विद्यापीठ परिसर, गारगोटी, शिरोळ- तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हातकणंगले- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, इचलकरंजी, गडहिंग्लज- पॅव्हेलियन हॉल, गांधीनगर, गडहिंग्लज, चंदगड- मिटींग हॉल (ऑडिटोरियम) तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
मतमोजणी ठिकाणाच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मतमोजणी परीसरात 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई केली आहे.
मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परीसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणे. मतमोजणी ठिकाणाच्या 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. मतमोजणी ठिकाणी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. चा वाहतुक, जवळ बाळगणे अथवा वापर करणे.
या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.