+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule31 Aug 24 person by visibility 235 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : स्मार्ट स्टडीच्या वतीने परदेशातील शिक्षण आणि करिअर संधींच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जीतोचे सचिव अनिल पाटील यांनी केले.

तरुणांना परदेशातील शैक्षणिक आणि करिअरच्या संधीबद्दल माहिती व्हावी, यासाठी जीतो कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने हॉटेल रेडिएंट येथे आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

जीतो कोल्हापूरचे सचिव सेक्रेटरी अनिल पाटील, स्टडी स्मार्टचे चेतन जैन, सीताराम कोरडे आणि करण कोरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना चेतन जैन यांनी परदेशातील शिक्षणासाठी संबंधित देश, विद्यापीठ आणि अभ्यासक्रमांची निवड करताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, परदेशातील विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या तरुणांना देशासह जगाच्या पाठीवर असंख्य रोजगार संधी उपलब्ध होतात. पायाभूत सुविधा, कालसुसंगत आणि उद्योग व्यवसायांची गरज ओळखून तयार केला जाणारा अभ्यासक्रम, बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात केले जाणारे बदल, विद्यापीठांचे जागतिक क्रमवारीमधील स्थान याचा विचार केला तर परदेशी शिक्षण संस्था आणि विद्यापीठे सरस ठरतात. परदेशात संशोधनावर दिला जाणारा भर विद्यार्थ्यांना करिअर संधी उपलब्ध करुन देण्यात उपयुक्त ठरतो. परदेशातील शिक्षण महाग आहे. परदेशातील शिक्षणासाठी स्कॉलरशीप मिळत नाहीत. तेथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया अवघड आहे हे भारतीय विद्यार्थी आणि पालकांमधील समज चुकीचा आहे. स्टडी स्मार्टच्या सिल्विया यांनी परदेशातील शिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक असलेल्या आयईएलटीएस परीक्षेचे स्वरूप कसे असते आणि त्याची पूर्वतयारी कशी करायला हवी याबद्दल माहिती दिली.

यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना चेतन जैन यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि पालकांना तज्ज्ञ समुपदेशकांकडून परदेशातील शिक्षणा आणि करिअर संधी या बद्दल व्यक्तिगत पातळीवरही माहिती देण्यात सीताराम कोरडे यांनी मार्गदर्शन केले.

▪️स्टडी स्मार्टच्या कोल्हापूर कार्यालयाचे उदघाटन
 या कार्यशाळेअगोदर विवेकानंद संस्थेचे डॉ. अभयकुमार साळुंखे, नेमिचंद संघवी, राकेश मुदगल, डॉ. पी. व्ही. कडोल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टडी स्मार्टच्या कोल्हापूर कार्यालयाचे उदघाटन झाले. ताराबाई पार्क येथील विवेकानंद कॉलेजसमोर असणाऱ्या या कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी सीताराम कोरडे, करण कोरडे यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.