+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule07 Sep 24 person by visibility 346 categoryराज्य
कोल्हापूर : 'गणपती बाप्पा मोरया... 'चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट तसेच पारंपरिक वेशभूषेत अभूतपूर्व उत्साहात शनिवारी लाडक्या बाप्पाचे सर्वत्र आगमन झाले. अवघा कोल्हापूर जिल्हा गणपतीच्या आगमनाने मंगलमय झाला आहे.

कोल्हापुरात लाडक्या गणरायाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, मार्केट यार्डातील कुंभार व्यावसायिकांच्या गणेशशाळांसह ठिकठिकाणी उभारलेल्या गणेशमूर्ती स्टॉल्सवर लोकांची गर्दी होती. सजवलेली वाहने, आतिषबाजी, 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष, अशा उदंड उत्साहामध्ये सकाळपासून घरगुती गणपतींचे आगमन आणि प्रतिष्ठापना करण्यात आली.

दुपारनंतर सार्वजनिक तालीम संस्था-तरुण मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुका पहावयास मिळाल्या. पारंपारिक वाद्य, साऊंड सिस्टिम, झांज पथक, मर्दानी खेळ, विद्युत रोषणाई अशा मंगलमय उत्साहपूर्ण वातावरणात गणेश आगमन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. 

विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये गेल्या चार दिवसापासून शहरातील काही भागांमध्ये तरुण मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन पूर्वीच मोठ्या उत्साहात झाले आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कुंभार गल्ल्यांसह प्रमुख मार्ग व चौकाचौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.