+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule07 Sep 24 person by visibility 468 categoryसामाजिक
कोल्हापूर : संपुर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आमदार सतेज पाटील यांच्याघरीही बाप्पा विराजमान झाले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. 
 
 वर्षातून एक वेळ येणाऱ्या गणेशोत्सवाकडे सर्वांचे डोळे आतुरतेने लागलेले असतात. आज सकाळपासूनचं गणेशाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरु होती. आमदार सतेज पाटील यांच्या घरी देखील आज सकाळी मंगलमय वातावरणात, बाप्पा विराजमान झाले. गणरायाचे आगमन घरी होताच, पाटील कुटुंबीयांनी मनोभावे पूजा केली. पारंपारिक पद्धतीने आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांच्याघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.

 गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडंही घातलं. आमदार सतेज पाटील यांनी मनोभावी प्रार्थना करत त्यांनी गणेशोत्सवा निमित्तानं जनतेला शुभेच्छाही दिल्या.

 तर आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्वांची विघ्न गणराया दूर करू दे, अस साकडही त्यांनी गणरायाला घातल. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, वैजंती संजय पाटील, शांतादेवी डी.पाटील, पूजा ऋतुराज पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.