कोल्हापूर महानगरपालिका : सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म-मृत्यु दाखले मिळणार
schedule09 Jul 25 person by visibility 186 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या मुख्य इमारतीबरोबरच सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म-मृत्यूचे दाखले नागरीकांना मिळण्यासाठी याचे विक्रेद्रीकरण करण्यात आले आहे. जन्म-मृत्यु दाखले यापुर्वी महापालिका मुख्य इमारत येथील नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध होते.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान कार्यक्रमाअंतर्गत सदरचे दाखले वितरित करण्याची सुविधा महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. यामध्ये विभागीय कार्यालयातील सर्व नागरी सुविधा केंद्र 1 ते 4 येथे हे दाखले मिळणार आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात घडणा-या प्रत्येक जन्म-मृत्युची नोंद जन्म मृत्यु विभागामार्फत नोंद घेणे व त्याची पडताळणी करुन अंतीम करण्याचे काम नियमितपणे केले जाते. यासाठी शहरातील सर्व जन्माचे व मृत्युचे अहवाल या कार्यालयाकडे प्राप्त होतात.
यासाठी नागरीकांनी नागरी सुविधा केंद्र क्र 1 गांधी मैदान (विश्वनाथ निकम 9850886044), नागरी सुविधा केंद्र क्र 2 शिवाजी मार्केट (सुनिल घाडगे 9518760567), नागरी सुविधा केंद्र क्र 3 राजारामपुरी (अच्युत आडुरकर 9850883785), नागरी सुविधा केंद्र क्र 4 ताराराणी मार्केट (शंकर कोळी 9370546288) यांचेशी संपर्क साधावा.
तरी नागरिकांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जन्म व मृत्यु नोंदणी विभागामार्फत करण्यात आले आहे.