+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule13 Aug 24 person by visibility 264 categoryगुन्हे
कोल्हापूर : नागाव येथील क्षेत्राची मोजणी करण्यासाठी आज (मंगळवार) सकाळी टोप भूमापन नगर कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे (वय ४५,रा. सांगली) हे त्यांचा सहकारी अमर चौगुलेसह उपस्थित होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना वारसा हक्क नोंदणीसाठी चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 अंबपवाडी येथील तक्रारदार यांनी नगरभूमापन कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. यावेळी सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाच मागितली. दोघांच्या तडजोडीने 4000 रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सांगितले होते. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या विषयी तक्रार केली होती. आज (मंगळवार) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावून सोनवणे याला चार हजार रुपयांची लाच घेताना पकडले. यावेळी त्यांच्यासोबत अमर चौगुले (रा. हातकणंगले) हा देखील होता.

सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस उपाधीक्षक बापू साळुंखे यांच्यासह पथकाने केली.