सहा दिवसीय कार्यशाळेचा समारोप समारंभ
schedule20 Dec 25 person by visibility 45 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ,शिक्षणशास्त्र अधिविभाग व महिंद्रा प्राइड क्लासरूम नांदी फाउंडेशन, हैदराबाद यांच्या वतीने “जॉब रेडीनेस अंडर इमप्लोयबिलीटी स्किलस फॉर स्टुडंट टीचर “या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळेचा समारोप समारंभ झाला.
यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे या होत्या यावेळी त्यांनी “विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, इतरांना प्रेरणा देणे ,सहकार्य वृत्ती व आवश्यक संवाद कौशल्य,कार्यतत्परता असायला हवी” असे प्रतिपादन केले.
प्रस्तुत कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी व नांदी फाउंडेशनच्या मुस्कान चावला यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले. प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरस्वती कांबळे , संगीता माने, ममता घोटल , संजना भालकर यांनी कार्यभार पाहिला.सूत्रसंचालन बी.एड,एम.एड (एकात्मिक) प्रशिक्षणार्थी सुहाना नायकवडी यांनी केले. यावेळी डॉ. रुपाली संकपाळ, सारिका पाटील, श्रीमती कादंबरी खांडेकर, डॉ. अंजली गायकवाड, श्रध्दा तांडेल ,संगीता चंदनवाले अतुल जाधव यांची उपस्थिती होती. नांदी फाउंडेशन कडून सहभाग घेऊन उत्कृष्ट कृती करणाऱ्या एश्वर्या मरूथूवर,नेहा लाटे,शेफाली जनबंधू,स्वाती आयवळे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.





