डीकेटीईचे प्रा. आरती भोकरे यांना पी.एच.डी. प्रदान
schedule20 Dec 25 person by visibility 59 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये एमबीए विभागातील प्रा. डॉ. सौ. ए.एस.भोकरे यांना विश्वेश्वरया टेक्निकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी. इन मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा.भोकरे या प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘अॅन अॅसिसमेंट ऑफ इंडियन पब्लिक सेक्टर बँक परफॉरमन्स प्री अॅण्ड पोस्ट मर्जर अॅण्ड एक्विझीएशनस’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी आयएमईआर कॉलेजचे, प्राध्यापक डॉ पी.एम.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ पी.एस.जाधव उपस्थित होते.





