कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी गैर हजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
schedule20 Dec 25 person by visibility 137 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी आज सर्व नियंत्रण अधिकारी, नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांची मुख्य निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथे आढावा बैठक घेतली. यावेळी विविध पथकांकडे नियुक्ती केलेल्या आणि आदेश देवूनही कामावर गैर हजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजच निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या संबंधी निवडणूक आयोग व संबधीत कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना आजच कळविण्याच्या सुचना देण्यात आल्या. निवडणूक कामगीरीचे आदेशामध्ये कोणताही बदल होणार नाही असे प्रशासक यांनी निर्देश दिले.
सोमवार दि.25 डिसेंबर 2025 रोजी निवडणूकीच्या संबधीत कामगीरीचे महापालिका, पोलिस विभागाचे संयुक्त प्रशिक्षण घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) तसेच व्हिडीओ पडताळणी पथकाच्या (VST) पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाला पत्र पाठविण्याच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे अद्याप ज्या गाडया अधिगृहीत झालेल्या नाही त्यांची आरडीओ विभागामार्फत अधिगृहीत करण्याचे व पोलिंग बुथवर ये जा करण्यासाठी बस रुटचे नियोजन करणेचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सुचीत केले.
यानंतर प्रशासकांनी शिये नाका, शिवाजी पूल, दुधाळी पॅव्हेलियन निवडणूक निर्णय अधिकारी क्र.3 व गांधी मैदान निवडणूक निर्णय अधिकारी क्र.5 या कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्यांच्या अखत्यारीतील भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) व व्हिडीओ पडताळणी पथके (VST) कार्यान्वीत झाली असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, वरिष्ठ लेखापरिक्षक सुनील चव्हाण, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत उपस्थित होते.





