आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
schedule05 May 26 person by visibility 190 categoryसामाजिक
जयसिंगपूर : माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
तत्पूर्वी सकाळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पार्वती औद्योगिक वसाहत येथे स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन स्वर्गीय आण्णांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर निवासस्थानी राजकीय, सामाजिक, उद्योग, सहकार, शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी यड्रावकर उद्योग समूह व यड्रावकर कुटुंबाच्या वतीने संजय पाटील यड्रावकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, विश्वासराव पाटील ( आबाजी), पंचगंगेचे चेअरमन पी. एम. पाटील, द. भा. जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील, उद्योगपती संजय घोडावत, उद्योगपती विनोद घोडावत, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, ए.वाय. पाटील, किशोरीताई आवाडे, सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, मौसमी आवाडे, रत्नमाला गांधी, तानाजी पवार रामचंद्र डांगे, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, सहायक निबंधक उर्मिला राजमाने, प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर, पोलीस निरीक्षक संतोष माने, प्रसाद खोबरे, पोलिस निरीक्षक गोरे, बाबासो चौगुले, कुरुंदवाड चे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, भवानीसिंह घोरपडे, विजितसिंह शिंदे, आगारप्रमुख आसमा सय्यद, रावसाहेब पाटील, प्रवीण यादव, विजय भोजे, अविनाश गायकवाड, सुभाषसिंह रजपूत, प्रकाश पाटील टाकवडेकर, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, सुरेश शेटे, विरेन शहा, रणजीतसिंह कदम, राजेश पाटील, जयसिंगपूर बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, जयसिंगपूर क्रेशर असोसिएशनचे पदाधिकारी, जयसिंगपूर आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, अमरसिंह निकम, कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक व नगरसेविका, जयसिंगपूर मराठा मंडळाचे पदाधिकारी , जयसिंगपूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, जयसिंगपूर बौद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी,
प्रकाश सातपुते, रोटरी क्लब ऑफ इनरव्हिलचे सर्व पदाधिकारी, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे सर्व पदाधिकारी, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, संभाजीपूर ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य, लिंगायत समाज जयसिंगपूरचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, यांच्यासह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध सेवा सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार यड्रावकर यांना भ्रमणध्वनी वरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार रोहित पवार, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेश क्षीरसागर, स्वस्तिश्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी, नवीद मुश्रीफ, अजित नरके, माजी आमदार उल्हास पाटील, गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे, अरुणरावजी इंगवले, जगदीश पाटील, भैय्या माने, बाळासाहेब सरनाईक, राजेश पाटील, ॲड मनोज पाटील, प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त मजरेवाडी येथून भालचंद्र कागले ट्रस्टच्या वतीने युवा नेते विनोद कागले यांनी महिलांसाठी विशेष एसटी गाडी देऊन महिलांना पंढरपूर येथे दर्शनासाठी स्वखर्चाने पाठवले. त्याचबरोबर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले, बुद्धिबळ स्पर्धा, बैलगाडी शर्यती यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गांधी चौक जयसिंगपूर येथे महिलांसाठी एसटी महामंडळा कडून NCMC स्मार्ट कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन गांधी रोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.