डीकेटीईचे प्रा. व्ही.बी. सुतार यांना पी.एच.डी. प्रदान
schedule18 Sep 25 person by visibility 57 categoryराज्य

इचलकरंजी : येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये इटीसी विभागात कार्यरत असणारे प्रा. व्ही.बी. सुतार यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. सुतार हे गेली १७ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘नाईट टाईम ऍनिमल डिटेक्शन ऍण्ड कोलिझन ऍव्हॉइडन्स सिस्टीम फॉर इंटेलिजिन्ट व्हेईकल्स’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी डी.वाय.पाटील कोल्हापूर च्या डॉ सौ. के.व्ही. कुलहल्ली यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. अडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.ए.पाटील उपस्थित होते.