कोल्हापुरात भाजपच्यावतीने आरोग्य शिबीर उत्साहात
schedule18 Sep 25 person by visibility 91 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत भाजपा कोल्हापूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज राजारामपुरी ४ थी गल्ली टाकाळा, महादेवराव जाधव वाचनालयात “आरोग्य शिबीर” संपन्न झाले. या शिबिरामध्ये रक्त तपासणी, कान,नाक, घसा तपासणी, नेत्र व मोतीबिंदू तपासणी, ह्रदयरोग तपासणी, सर्व प्रकारची बालरोग तपासणी, मधुमेह आणि रक्तदाब तपासणी, अस्थिरोग तपासणी, दंत तपासणी, मधुमेह संवेदनशीलता तपासणी, आम्लपित्त विकार तपासणी अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. दिवसभरात ४५० पेक्षा अधिक नागरिकांनी शिबिरास भेट दिली.
या आरोग्य शिबिरास महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थिती दर्शवून त्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना त्यांच्या उपयोगी वस्तुंचे वितरण, कानाचे मशीन अशी उपकरणे वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विराज चिखलीकर, राजू मोरे, अमर साठे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, सौ दिपाली जाधव हेमंत आराध्ये, विजय आगरवाल, शौलेश पाटील, अनिल कामत, अनिकेत अतिग्रे, रीविकीरण गवळी, अभिजित शिंदे, अतुल चव्हाण, अमेय भालकर, राजगणेश पोळ, संतोष माळी, अमोल पालोजी, महेश यादव, धीरज पाटील, रविंद्र मुतगी, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, महादेव बिरंजे, कोमल देसाई, माधुरी कुलकर्णी, छाया साळोखे, छाया रणवरे, शामली भाकरे, शिवानंद पाटील, शीतल तिरूके, विशाल शिराळकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.