+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule06 Sep 24 person by visibility 330 categoryगुन्हे
कोल्हापूर : पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून करणाऱ्या पतीचा पंचगंगा नदी पात्रात मृतदेह आढळून आला. सागर कोळवणकर असे त्याचे नाव आहे.

पुलाची शिरोलीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या सागर कोळवणकर व मनीषा कोळवणकर हे आपल्या मुलांसह राहत होते. सोमवारी रात्री एक वाजण्यासुमारास सागर याने पत्नी मनीषा झोपेत असताना तिच्या डोक्यात हातोडा मारून गंभीररीत्या जखमी केले होते. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान बुधवारी रात्री मनीषाचे निधन झाले.

 त्यानंतर शिरोली पोलिस ठाण्यात सागरवर खुनाचा दाखल करण्यात ना आला होता. सोमवारी रात्री मनीषाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी सागर याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. त्यामुळे पोलिसांनी अटक न करता रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात पाठवले. पण सागर हा पहाटेपर्यंत रुग्णालयात थांबला आणि तेथूनतो पळ काढत बावडा मार्गे शिये पंचगंगा नदी पुलावर आला आणि त्याने नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पहिल्याचे समजते. त्यामुळे सागर याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत होता. दरम्यान, दोन दिवस सागर यांचा मृतदेह पोलीस शोधत होते. अखेर शिरोली गावच्या हद्दीत ब्रम्हणात येथे सागरचा मृतदेह आढळला रात्री उशिरा मृतदेह तपासणी सुरू होती.