दिवाळी झाली, पण लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
schedule23 Oct 25 person by visibility 81 categoryराज्य

मुंबई : राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल, अशी लाडक्या बहिणींना आशा होती. तीही आता मावळली आहे. दरम्यान सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि दिवाळी गोड झाली. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, याकडं बहिणींचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे.यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली होती.