SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुलांमधील ‘अंथरूण ओले करण्याच्या’ समस्येबाबत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मार्गदर्शनसहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाहीइचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस; ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, प्रारंभ, लोकार्पणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतआपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकदेशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणसारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधीआत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षकअलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिका

जाहिरात

 

सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान

schedule22 May 25 person by visibility 256 categoryराज्य

मुंबई : डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर व्यक्तीचे नाव. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील.आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले आणि करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.

करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते त्यांच्या भगिनी प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे वास्तव्यास आहेत. वृध्दाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबियांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes