SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस; ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, प्रारंभ, लोकार्पणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतआपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकदेशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणसारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधीआत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षकअलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिकाशिवाजी विद्यापीठातील प्रियंका पवारची जर्मनीतील हॅनोवर विद्यापीठामध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी निवडप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद

जाहिरात

 

आत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

schedule22 May 25 person by visibility 182 categoryराज्य

कोल्हापूर : आत्मा योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2025-26 गावपातळीवर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता गुडाळेश्वर मल्टिपर्पज हॉल, गुडाळ, ता. राधानगरी येथे होणार आहे. 

हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय  राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

 या प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता सेंद्रीय शेती विषयाचे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षणाच्या ठिकाणी आत्मा योजनेंतर्गत सेंद्रीय शेती प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले असून कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी गटांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक, रक्षा शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes