सारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी
schedule22 May 25 person by visibility 207 categoryराज्य

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे अंतर्गत "श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूल रूम (IGTR) कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम" योजनेव्दारे यांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोर्सचे सारथीकडून विनामूल्य प्रशिक्षण इंडो जर्मन टूल रूम (IGTR) औरंगाबादच्या कोल्हापूर शाखेकडून देण्यात येते.
सारथी मार्फत राबविण्यात येणा-या या योजनेची जाहिरात सारथी संकेतस्थळावर नुकतीच प्रसिध्द झाली असून 1) Jr Designer CAD/CAM, 2) Jr Designer- Tool व 3) Technical Superviser Computer Aided Engineering या 5 महिन्यांच्या कोर्सेससाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 01 जून 2025 आहे.
महाराष्ट्रातील मराठा, कुणबी समाजातील 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी sarthi-maharashtragov.in या सारथीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. भरलेल्या अर्जाची मुळ प्रत, प्रमाणपत्रे त्यांच्या साक्षांकित प्रती पडताळणीसाठी व मुलाखतीसाठी शिवाजी विद्यापीठ परिसरातील इंडो जर्मन टूल रूम (IGTR) या शाखेमध्ये दिनांक 4 जून 2025 रोजी घेऊन समक्ष हजर राहावे, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्राचे सह व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.