कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक
schedule22 May 25 person by visibility 255 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे 2023 मध्ये महेंद्र पंडित हे रुजू झाले होते. दरम्यान आज त्यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली. गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चांगली कामगिरी बजावली होती.
योगेश गुप्ता हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशिक्षणानंतर मुंबई, हिंगोली, परभणी येथे त्यांनी सेवा बजावली. मुंबईत जलद कृती दलाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. सध्या ते हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.