+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule13 Aug 24 person by visibility 270 categoryआरोग्य
 कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिलासाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांनीयुक्त असलेल्या महिलासाठीच्या या स्वतंत्र विभागाचे उद्घाटन डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील आणि वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

  डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजचा 35 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महिलासाठीचा या स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभागाचा शुभारंभ करण्यात आला. अत्यंत अनुभवी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्ण सहाय्यक, कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध असतील. या विभागात 120 बेड असून यातील 60 बेड हे प्रसुती विभागासाठी आहेत. या विभागात 15 तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, अद्यावत व्हेंटिलेटर, विविध अतिदक्षता विभाग व अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून होणार असल्याची माहिती पूजा ऋतुराज पाटील व वृषाली पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 

दरम्यान, हॉस्पीटलमध्ये मोफत प्रसूती सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी दिली. यामध्ये नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन, जोखमीच्या प्रसूती आदी सर्व सेवा व औषधोपचार पूर्णपणे मोफत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
  
नव्या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी नव्यान सुरु झालेल्या या विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, डॉ. शीतल मिरचुटे, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे डायरेक्टर डॉ. अजित पाटील, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमारणी जे., फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, फ़िजिओथेरपी प्राचार्य डॉ. अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटलीटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.