कोल्हापूर : विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळेच्या प्राचार्यपदी डॉ. वाय. बी. गोंडे हे रुजू झाले. त्यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. राक्षसे यांच्याकडून प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.
याप्रसंगी श्री दत्त प्रसारक पणुत्रेचे विठ्ठल पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी डॉ. वाय. बी गोंडे म्हणाले, महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाची प्रगती उंचावून नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबवून गुणवत्ता वाढीला आणि सर्वांगीण विद्यार्थी विकासाला प्राधान्यक्रम दिला जाईल व ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट महाविद्यालय बनविण्याचा आपला प्रयत्न असेल.
प्राचार्य डॉ. वाय. बी गोंडे यांना अध्यापन व प्रशासकीय 35 वर्षाचा अनुभव असून त्यांनी 17 वर्षे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले आहे. याप्रसंगी महाविद्यालयाने स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी संस्था प्रतिनिधी डॉ. नितीन पाटील , प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा. नरेंद्र सूर्यवंशी यांनी केले.