कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : जात पडताळणी साठी आवश्यक नमुना 15-अ (15 A) फॉर्म साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
schedule18 Dec 25 person by visibility 34 categoryमहानगरपालिका
▪️आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व पारदर्शकतेसाठी भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) आणि व्हिडीओ पडताळणी पथक (VST) व लेखापरीक्षाणासाठी 333 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करावयाच्या उमेदवारांसाठी आवश्यक नमुना 15-अ (15 A) फॉर्म साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर उमेदवारांनी जात पडताळणी समितीकडे हे अर्ज सादर करावयाचे आहेत. तरी ज्या उमेदवाराकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नाही अशा उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा व 15 A नमुन्यात पत्र घेऊन सविस्तर प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे सादर करू शकतात.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व पारदर्शकतेसाठी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आज भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) आणि व्हिडीओ पडताळणी पथक (VST) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भरारी पथकासाठी 54 कर्मचारी, व्हिडीओ पडताळणी पथकासाठी 35 कर्मचारी, स्थिर पथकासाठी 99 कर्मचारी, झोनल ऑफिसर म्हणून 61 कर्मचारी तसेच लेखापरीक्षणासाठी 49 कर्मचारी अशा एकूण 333 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख 11 नाक्यांवर तीन शिफ्टमध्ये पथकांची तैनाती करण्यात आली असून, निवडणूक कालावधीत नियमभंग रोखण्यासाठी आणि प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.





