नवीन दोनचाकी नोंदणी मालिका २२ डिसेंबर पासून सुरु
schedule18 Dec 25 person by visibility 60 categoryराज्य
कोल्हापूर : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजीमार्फत नवीन दोनचाकी MH५१H नोंदणी मालिका दि. २२ डिसेंबर पासून सुरु करण्यात येत आहे. नवीन दोनचाकी MH५१G पसंती क्रमांकाचे अर्ज २२ व २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ५ या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील.
वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे.
पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर स्विकारला जाणार नाही. असे अर्ज बाद समजण्यात येतील. डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढताना DY REGIONAL TRANSPORT OFFICE, ICHALKARANJI या नावानेच काढलेला असावा इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहलेला असणे आवश्यक असेल. नवीन दोनचाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत 22 व 23 डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ५ या वेळेत अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) सादर करावा. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर पसंती क्रमांकाच्या फक्त एकापेक्षा जास्त मागणी केलेल्या आकर्षकाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा नोंदणी क्रमांकाचा लिलाव 24 डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी ९.४५ ते ४ या कालावधीत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.
एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 24 डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यालयात घेण्यात येईल. या लिलावासाठी फक्त अर्जदार प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. लिलावासाठी येताना अर्जदाराने आपले ओळखपत्र व प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याकडे प्राधिकारपत्र व स्वतःचे ओळखपत्र आणने आवश्यक आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक व पत्ता अर्जावर लिहणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक लिहला नसल्यास यादीमध्ये नाव आलेतरी आपला कोणताही हक्क आकर्षक नोंदणी क्रमांकावर राहणार नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. आकर्षक नोंदणी क्रमांक घेतलेल्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत वाहन नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपला क्रमांक आपोआप रद्द हाईल. तथापि हे शुल्क सरकार जमा हाईल आणि शुल्क परत करता येत नाही याची नोंद घ्यावी. आपण मागणी केलेल्या आकर्षक क्रमांकाची पावती झाल्यानंतर पावती झाल्याचा संदेश आपल्या आधार नंबरशी नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यानंतर त्याचदिवशी पावती घेण्याकरीता स्वतः हजर राहून पावती तपासून घ्यावी. दुसऱ्यादिवशी पावतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. मागणी अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, अशी माहिती इचलकरंजीचे प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी दिली आहे.





