+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Sep 24 person by visibility 331 categoryमहानगरपालिका
▪️ इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या 1035 व घरगुती व मंडळांच्या लहान 1101 गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी सार्वजनिक मंडळांनी चारही विभागीय कार्यालय अंतर्गत 172, घरगुती व मंडळांच्या लहान मूर्तीसह 1015 गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी विसर्जित केल्या. या सर्व मुर्त्या महापालिकेच्या वतीने संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या आणि इराणी खन येथे सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या 1035 मोठ्या गणेश मूर्ती व 1101 लहान गणेश मुर्ती अशा 2136 गणेश मूर्ती इराणी खण येथे पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या.

 महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक नियोजन पध्दतीने व शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन जवान, वैद्यकीय पथक, व्हाइट आर्मी, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दिवस व अहोरात्र काम केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.

 पापाची तिकटी टीम व क्रांतिवीर भगतसिंग येथे व्हाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळांची शेवटची गणपतीची आरती पहाटे 4.15 वाजता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्य मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या शेवटच्या गणेश मुर्तीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी व शहर पोलिस उप-अधिक्षक अजित टिके यांच्या हस्ते इराणी खण येथे आरती करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, महापालिकेचे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इराणी खन येथे शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

 दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील स्वागत मंडपामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आले. पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात 284 गणेश मंडळांची नोंद झाली असून निर्माण चौक येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात 313 गणेश मंडळांची नोंद झाली.

▪️महापालिकेची सर्व यंत्रणा 25 तासाहून अधिक काळ राबली
 महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा 25 तासाहून अधिक काळ राबली. विसर्जना पूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी, अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी मोठे हॅलोजन लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विसर्जन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. मिरवणूक मार्गावर व इराणी खण येथील विसर्जनाच्या स्थळी वैद्यकीय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 10 तराफे, 4 क्रेनची व 320 हमालांची व्यवस्था करण्यात आली होती. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना रिफ्लेक्टर जॅकेट देण्यात आले होते. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बंदिस्त बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

  विसर्जनादरम्यान आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी आलेले 35 मे.टन. 10 डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागाचे 2500 कर्मचारी, 70 टँम्पो 320 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 6 ॲम्बुलन्स व 10 फलोटींगचे तराफे अशी व्यवस्था करण्यात आली होती.

     यावेळी इराणी खण येथे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकि अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी,विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी 25 तासाहून अधिक तास काम करून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन यशस्वीरित्या पार पाडले.