+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule01 Sep 24 person by visibility 241 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अनेक मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यासाठी सार्वजनिक ठिकाणी अमंडप टाकून बाप्पाची प्रतिष्ठापणा केली जाते.

यासाठी जे मंडप उभारले जातात त्यांच्या परवानगी देताना महापालिका मंडळांकडून खड्डा पावती घेत होती. जे मंडळ खड्डा न खोदता मंडप उभारत होते त्यांनाही या पावतीचा भुर्दंड लागत होता. 

या धोरणाचा विरोध करत आम आदमी पार्टीने जी मंडळे न खड्डा पाडता मंडप उभारणी करतील त्यांना खड्डा पावती आकारू नये अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती.

यावर महापालिकेने खड्डे न पाडणाऱ्या मंडळांना खड्डे पावती न आकारण्याचा निर्णय घेतला. शंभर रुपये प्रति शंभर चौरस फूट इतके नाममात्र जागा भाडे आकारून परवानगी देण्यात यावी असे निर्देश शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिले.

त्यामुळे ज्या मंडळांनी खड्डा न पाडता मांडव उभा केलेला आहे त्यांनी खड्डा पावती भरू नये असे आवाहन आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केले आहे. 

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मयूर भोसले आदी उपस्थित होते.