+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule06 Sep 24 person by visibility 213 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची बी.ए., बी.कॉम, एम.ए.(मराठी, हिंदी, इंग्रजी,समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस रविवार दि.०८ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.

 डॉ.मोरे म्हणाले की, दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे सर्व अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त आहेत.त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे,शिवाय महाविद्यालयास तुकडी मान्यता न मिळाल्याने,तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच १२ वी रिपीटरच्या विद्यार्थ्यांचा पुरवणी निकाल जाहीर केलेला आहे अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या एकूण ८६ अभ्यासकेंद्रात प्रवेशाची संधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थी,गृहिणी,कामगार,सैनिक,उद्योजक,शेतकरी, सरकारी कर्मचारी,खाजगी कंपन्या आदिनी आपला प्रवेश निश्चित करावा.

शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education लिंक वर प्रवेशाबाबतची जाहिरात उपलब्ध असून https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा. 

    जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयात प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा ही लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाना प्रवेशित व्हावे अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापिठातील मुख्य कार्यालयाशी अथवा नजीकच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.

◀️ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रम दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
◀️ तसेच एम.बी.ए.(डिस्टन्स मोड ) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दि.२२ सप्टेंबर रोजी असल्याने प्रवेश परीक्षा अर्ज करण्याची अंतिम दि.२० सप्टेंबर आहे.ज्या विद्यार्थी अथवा शासकीय व निम्न शासकींय कर्मचारी यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले.