SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटील

schedule27 Aug 26 person by visibility 434 categoryउद्योग

◼️आमदार शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील सह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी ठराव धारकांची भेट 

चंदगड : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय भेटीगाठींना वेग आलाय. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत असल्याचं काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. गोकुळचा कारभार राजकारणविरहित असावा, दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक आहे. आणि शेतकरी-दूध उत्पादकांचं राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असे पॅनेल उभं करून २५ जागा स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

 गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार सतेज पाटील यांनी चंदगड तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यात आमदार पाटील यांनी सकाळी 8 वाजता चंदगड तालुक्यातील हेरे गावच्या महादेव प्रसादे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर सकाळी साडेआठ वा. चंदगड काँग्रेस कमिटी कार्यालयात दूध संस्था प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर सकाळी सव्वा नऊ वाजता चंदगडमधील लक्ष्मण गावडे यांच्या ऑफिसला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सकाळी पावने दहाच्या सुमारास भाजपाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

 तसंच अडकूरच्या अभय देसाई, बबन देसाई, बेळेभाटच्या नितिन पाटील, शांताराम पाटील, दयानंद काणेकर , शिवाजी सावंत, माजी आमदार भरमू अण्णा पाटील, शामराव बेनके, मोहन परब, शिनोळीचे प्रभाकर खांडेकर, कल्लापण्णा भोगम, जिल्हा परिषद सदस्य मानसी भोगम, विलास पाटील, माजी सभापती ज्योती पाटील, दीपक पाटील आणि अशोक देसाई यांच्या घरी सदिच्छा भेटी दिल्या. तसंच आमदार पाटील यांनी दिवसभरात चंदगड तालुक्यातील विविध ठिकाणी गोकुळ ठराव धारकांच्या गाठीभेटी घेत आपली भूमिका ठराव धारकांसमोर मांडली.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना भेटणं आपलं काम आहे, कुणा आमक्याचं तमक्याचं घर टाळण मला योग्य वाटत नाही. त्यामुळं मी सर्वांना नमस्कार करतो. शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रकाश पठाडे, भाजपाचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.

विधानपरिषद, जिल्हापरिषद निव़डणूक वेगळी आणि सहकाराची निवडणूक वेगळी आहे. सहकार क्षेत्रात विविध पक्षांच्या नेत्यांना भेटण्यात गैर काहीच नसल्याचं सांगत, जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणविरहित निर्णय घेण्याची गरज असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलंय.

गोकुळच्या कारभारावरूनही आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. कोणताही एकटा नेता गोकुळचा मालक होऊ शकत नाही. दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळचा खरा मालक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून दूध तयार करतात, तर महिला दूध उत्पादकही मोठ्या प्रमाणावर गोकुळला दूध पुरवतात. त्यामुळं गोकुळच्या कारभाराचा खरा केंद्रबिंदू दूध उत्पादकच असला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली

महायुतीमध्ये अनेक पक्ष असल्यानं नाराजी निर्माण होण्याची शक्यता आणि निवडणुकीतील संभाव्य समीकरणांबाबत सध्या कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्पष्ट झाल्यानंतर भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, आगामी निवडणुकीत शेतकरी, गरीब आणि दूध उत्पादकांचं पॅनेल उभं करून २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका असल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याला यापूर्वी उमेदवारी देताना झुकतं माप दिलं होतं. मात्र यावेळी तसं होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोकुळच्या मागील कारभाराचा दाखला देत दूध उत्पादकांना दिलेल्या दूध दरवाढीचाही त्यांनी उल्लेख केला. मागील पाच वर्षांत गाई आणि म्हशीच्या दूध दरात प्रत्येकी दहा रुपयांची वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं. गोकुळचा कारभार राजकारणविरहित ठेवून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचं आश्वासन देत, आपल्या पॅनेलला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन सतेज पाटील यांनी केलंं.

ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी म्हैस दुधाच्या बाबतीत चंदगड तालुका एक नंबर आहे. आणि तो कायम एक नंबर राहील. आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून जे काय पॅनेल होईल, त्या पॅनलबरोबर चंदगड तालुक्यातील दूध उत्पादक आणि ठरावधारक ठामपणे उभे राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी राजकारणात शेतकऱ्यांचं हितही बघितलं पाहिजे. सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. एखाद्या कामासाठी मी त्यांची मदत घेत असतो. असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

दौऱ्यावेळी रामराजे कुपेकर, गोपाळराव पाटील, अंजनाताई रेडेकर, अभिजीत तायशेटे, सत्यजित जाधव, विद्याधर गुरुबे, सचिन घोरपडे, राहुल देसाई, दयानंद रेडेकर, सचिन घोरपडे, विलास कांबळे,  अशोक जाधव, एम. जे. पाटील, संभाजी देसाई, विक्रम चव्हाण -पाटील, नितीन पाटील, निंगाप्पा आवडण, मल्लिकार्जुन मुगोरी, शंकर ओउळकर, शिवाजी सावंत ,वसंत निकम, जगन्नाथ इंगवले, गोविंद पाटील यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक विविध संस्थेचे संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes